गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (08:43 IST)

मनसेची विद्यार्थी आघाडीची नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर

maharashatra navnirman sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीची जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी मनविसेचे प्रदेश अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी जाहीर केली. सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. या वेळी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, मनपा सभागृह नेते सलीम शेख आदी उपस्थित होते.

संदीप भवर, खंडेराव मेढे या दोन प्रदेश उपाध्यक्षांचा समावेश असलेल्या या कार्यकारिणीत प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी उमेश भोई, गणेश वाळके, संदीप निगळ, अरुण दातीर यांची वर्णी लागली आहे. याशिवाय अतुल धोंगडे, देवा दाते, गणेश मोरे, किशोर तेजाळे, दीपक चव्हाण आदींवर संघटक म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. मनविसेच्या शहर कार्यकारिणीत ११ संघटक, १३ उपाध्यक्ष, १३ सचिव, १३ सरचिटणीस, २० चिटणीस आणि सात शहर कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor