सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (07:28 IST)

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

Below average rainfall in August ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. अल निनोचा प्रभाव असला तरी आयओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयओडी न्युट्रल आणि पॉझिटिव्हकडे सरकत असल्याने दोन महिन्यात चांगला पाऊस झाला.
 
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधारेचा अंदाज आहे. ४ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.