भीमा कोरेगाव प्रकरण : पोलिसांनी १२ जणांना घेतले ताब्यात
भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी कारवेस सुरुवात केली आहे. यामध्ये तब्बल आठवडाभरानं पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात करण्यात असी असून 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत. यामधील सर्व संशयित आरोपी हे भीमा कोरेगाव, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील रहिवासी आहेत. यात जे पकडले गेले आहेत त्यामध्ये दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अतिशय संवेदनशील प्रकरण असल्यानं बाराही आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत करणार नाहीत. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत असून. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. आठवड्याभरानंतर 12 जणांना अटक करण्यात आलेली असली तरीही पोलिसांचा याप्रकरणी अजूनही पुढील तपास सुरु राहणार आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत असून जे दोषी आढळतील त्यांना अटक करण्यात येणार आहे. हे प्रकरण राज्य सरकारने योग्य रीत्या हाताळले नाही असा आरोप विरोधकांनी केला होता. तर अनेक सामाजिक संस्था आणि विचारवंतानी या घटनेचा निषेद केला असून भिडे गुरुजी यांवर सुद्धा अनेकानी आरोप केले आहे.