रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सातारा , बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (23:25 IST)

धनंजय मुंडेंचं मोठं विधान

dhananjay munde
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत  म्हटले की येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री (CM) हा आपलाच असेल. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
तसंच यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या (Shivsena)आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली. तर पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदाचे खाते हे माझ्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं भाकित केलं आहे.
 
ते म्हणाले, 'कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील, आपलेच असतील, मात्र, ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.