चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले
राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.
फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण चव्हाण यांनी दिलीय.