रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (08:21 IST)

कौशल्य विकास योजनेचा कारभार बोगस :मनसे

मनसेने नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्र संदीप देशपांडे यांनी विभागाच्या आयुक्तांना दिले..तसेच नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. संदीप देशपांडे यांनी नवाब मलिकांवर खोचक टीका केलंय.
 
आम्ही कौशल्य विकास योजनेचा जो कारभार किती बोगस आहे हे पुराव्या सह त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांना आम्ही विनंती केली आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. पण कंपन्या रजिस्ट्रेशन झालं पाहिजेत. या विभागाचा शंभर कोटीच्यावर टर्न ओवर आहे आणि कंपन्या रजिस्ट्रेशन होत नाही. मनसे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणार ज्याकडे भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. राज साहेबांनी पत्राच्या माध्यमातून त्यांना भूमिपुत्रांनसाठी रोजगार निर्मिती करा, असं सांगितल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
 
आमचा नवाब मलिकांना विरोध नाही परंतु नवाब मलिक यांच्याकडे कौशल्य विकास व रोजगार विभाग येतात. ते जावून जेल मध्ये बसले आहेत. आम्ही जॉब कोणाला विचारयचा. आम्हाला काम करावे लागणार आहे कारण मंत्री जेल मध्ये आहे. राजीनामा द्यायचा की नाही त्यांचा पक्ष ठरवेल. आमचा प्रश्न आहे की उदया आम्हाला मंत्री भेटले नाही तर आम्ही आर्थर रोड जेलला भेटण्यासाठी जायचं का? अशी खोचक टीका नवाब मलिकांवर संदीप देशपांडे यांनी केली.