रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मनमाड , सोमवार, 8 मे 2017 (10:35 IST)

मनमाडमध्ये डॉक्टर, नर्सला मारहाण

रुग्णला ऍडमिट करून घेण्यास नकार दिल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याची घटना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात घडली.
 
या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय हॉस्पिटल मध्ये संप पुकारण्यात आला आहे.

आपत्कालीन वगळता ओपीडी व इतर सेवा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉक्टर, नर्स मारहाण प्रकरणी पोलिसांनी 3 जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.