CSTजवळचा फूटओव्हर ब्रिज कोसळला, पाच जण ठार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला फूटओव्हर ब्रिज कोसळला. ही घटना संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
हा कामा रूग्णालयाजवळचा पूल कोसळला आहे. या घटनेत पाच जण दगावले आहे. या घटनेत अनेक लोक जख्मी झाले आहे. यांना जीटी रूग्णालय आणि कामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावं अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (वय ४०), सिराज खान (वय ३२), इतर दोन प्रवाश्यांचे नाव समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत दगावलेल्या दोन महिला जीटी रूग्णालयाच्या कर्मचारी होत्या.
CM फडणवीस घटनास्थळी पोहचले असून त्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मृतक लोकांच्या कुटुंबाला ५ लाख देण्याची घोषणा केली आहे