सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2019 (17:25 IST)

मुंबईत गुंडांच्या गोळीबारात नागरिकांना जेरीस आणणारा बिल्ला ठार

मुंबई आर्थिक राजधानीतील कुर्ला येथील हलवा पूल परिसरात पूर्ववैमनस्यातून जानू पवार उर्फ बिल्ला या गुंडाची गोळ्या घालून हत्या केली गेली आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. यामुळे  परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. मारेकऱ्यांची ओळख पटली असून विनोबा भावे नगर पोलिसांनी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला ताब्यात घेतले आहे.
 
कुर्ल्यातील विनोबा भावे परिसरात बिल्लाची मोठी दहशत होती तो येथील मोठा गुंड होता. बिल्ला हा नागरिकांना धमकावणं, त्यांना मारहाण करणं या सारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात होती. तर  एका दुसऱ्या टोळीसोबत त्याचा जोरदार वाद देखील  सुरू होता. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बिल्ला जामीनावर बाहेर आला होता. सकाळी बिल्ला हलवा पूल येथून जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या,  रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिल्लाला जमावाने तातडीने रिक्षातून सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत असून नेमके कारण शोधत आहेत.