बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

राज्यपाल विद्यासागर राव विधान भवनात पोहोचताच विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, तेव्हा राज्यपालांनी RSS चे समर्थन केले होते. म्हणून विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरही बहिष्कार घातला.
 
राज्यपाल हे सरकारच्या वतीने ‘माझे सरकार हे करणार आहे,’ असे अभिभाषणात सांगतात. परंतु यांच्या सरकारने आजवरच्या अधिवेशनात सांगितलेली एकही गोष्ट केलेली नाही, उलट असहिष्णुतेचे वातावरण पसरवले, असा आरोप या वेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
 
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांना आपले मत मांडले म्हणून भर सभेत खाली बसवण्यात आले, सचिन तेंडुलकरला मत मांडले म्हणून देशद्रोही ठरवण्यात आले. हे देशात काय चालले आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नथुराम गोडसेच्या जन्मदिनी शौर्य दिन साजरा करण्यात आला, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही त्याबाबत काहीच कारवाई केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.