मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (16:07 IST)

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने मातोश्रीला गंडा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने मातोश्रीला गंडा घालणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. धीरेन मोरे असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. आदित्य ठाकरे ऑनलाइन शॉपिंग न केलेल्या वस्तू मातोश्रीवर जाऊन खपवायचा. तब्बल चारवेळा त्याने मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या नावाने खोटे पार्सल दिले. मात्र, गुरुवारी आदित्य ठाकरे घरात असल्यामुळे तो पकडला गेला. 
 
आधी धीरेनने आदित्य ठाकरे याच्या नावाने पार्सल तयार करून हलक्या दर्जाचे हेडफोन पॅक करून ते 'मातोश्री'वर पोहोचवले होते. 'मातोश्री'वरील कर्मचाऱ्यांनी ते पार्सल परस्पर घेऊन धीरेनला पैसे दिले होते. यामुळे धीरेनची हिंमत आणखीनच वाढली. त्यामुळे आणखी तीनवेळा त्याने अशीच खोटी पार्सल मातोश्रीवर नेऊन पैसे उकळले.