Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना

Updated: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (15:38 IST)
 
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
 
श्री. पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे व्हावे. लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावे, अशी अनुयायांची भावना आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे. स्मारकाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी आहे. याबाबतची शक्यता पडताळून पहावी.
 
श्री. बनसोडे यांनीही स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्री. शेवाळे यांनी स्मारक व चैत्यभूमी यांना जोडणारा रस्ताही करण्यात यावा, अशी सूचना करून चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे व अध्यक्ष श्री. महेंद्र कांबळे यांनी स्मारकासंबंधीच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावा, स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे सांची स्तुपाच्या रुपात असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर स्टॅच्यू ऑफ इक्विटी असे लिहावे. सुसज्ज ग्रंथालय असावे, स्मारकाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विद्यापीठ स्थापन करावे, डॉ. आंबेडकर यांचे संघर्ष दाखविणारे चित्रण, विविध आंदोलनाचे चित्रण तसेच त्यांचे आई-वडील, पत्नीचे शिल्प रेखाटावे, डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे प्रदर्शन दालन उभारावे आदी मागण्या यामध्ये मांडण्यात आल्या. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती सोनिया सेठी, वास्तुरचनाकार शशी प्रभू आदी यावेळी उपस्थित होते.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

पुण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; सिंहगड किल्ला १ आणि २ ऑगस्ट रोजी पर्यटकांसाठी बंद

कुलगाममध्ये २ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू, काश्मीरमधील १० दिवसांतील दुसरा दहशतवादी हल्ला

LIVE: मुसळधार पावसाचा रेड अलर्ट पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

IND vs SL: बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला श्रीलंके विरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी परवानगी मिळाली

पंतप्रधान आणि पियुष गोयल यांच्या एआय-मॉर्फ्ड व्हिडिओ प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केला

पुढील लेख
Show comments