Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पावसाचा जोर कमी होणार, पण ‘या’ जिल्ह्यात बरसणार; पंजाबरावांचा हवामान अंदाज

Updated: गुरूवार, 28 जुलै 2022 (14:41 IST)
 
यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना काही काळ शेतीची कामे करता येणार आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील विशेषता विदर्भात पाऊस अधून मधून बरसत आहे.
 
भारतीय हवामान विभागाच्या मते, आज देखील पूर्व विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बरसणार आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपल्या हवामान अंदाजासाठी आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारे पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज  सार्वजनिक करण्यात आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तविलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 28 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमालीचा ओसरणार आहे.
 
28 29 आणि 30 जुलै रोजी राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र या दरम्यान राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे देखील डख यांनी स्पष्ट केले पंजाबराव  यांच्या मते, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातील नांदेड उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यात सर्वदूर नाही पण काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
 
निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून, पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टी सारख्या पावसामुळे झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
 
विदर्भात अधिक प्रमाणात अतिवृष्टी झाली असल्याने जगातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले होते. मात्र आता गेल्या आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने विदर्भातील पूरस्थिती पूर्णतः नियंत्रणात आले असून जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झाले आहे.
 
शेतकरी बांधव देखील आता शेतीच्या कामासाठी लगबग करत आहेत. दरम्यान विदर्भात असे अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे तर विदर्भात असेही अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांना तिबार पेरणी देखील करावी लागत आहे. निश्चितच आता भारतीय हवामान विभाग तसेच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

गडकरी आणि बावनकुळे यांनी नागपूरमधील मालमत्ता आणि नवीन घरांच्या नोंदणीला स्थगिती मिळाल्याच्या अफवा फेटाळून लावल्या

LIVE: तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Apple Foldable iPhone :ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन या वर्षी येऊ शकतो

Independence Day 2026 Essay in Marathi स्वातंत्र्य दिन निबंध

FCRA दुरुस्ती विधेयक का आणले? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केला सरकारचा हेतू

पुढील लेख
Show comments