गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मार्च 2020 (10:04 IST)

लक्षात ठेवा, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतसाठी '११२'

विविध आपत्कालीन परिस्थितीतीमध्ये आपल्याला विविध नंबर डायल करावे लागावे लागत असत. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०० क्रमांक, आग लागल्यास अग्निशमन दलासाठी १०१ आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ असे तीन क्रमांक लक्षात ठेवावे लागत असत. मात्र, आता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाचा ११२ हा एकच क्रमांक उपलब्ध होणार आहे. तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून डायल ११२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या गृह विभागाने आखली आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवा या तीन यंत्रणांमध्ये समन्वय झाला नाही तर मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे संपूर्ण देशात आपत्कालीन सेवा ११२ या एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करून देण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. 
 
या नवीन टोल फ्री क्रमांकाच्या सेवेसाठी राज्यातील पोलिस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या गृह विभागाने आखली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद सेवेसाठी पोलिस विभाग व महेंद्र डिफेन्स सर्व्हिसेस यांच्यात करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ४०४ कोटी ४४ लाख ६१ हजार रुपये आहे.