गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (15:19 IST)

सकाळी १० :३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे

राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे.

दरम्यान, उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, यासाठी त्यावर बारकोड असणार आहेत. उत्तरपत्रिकेवर यापूर्वीही बारकोड असायचा. मात्र यावर्षीपासून पुरवणीवरही बारकोड असेल. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी बसत असून यात 9 लाख 73 हजार 134 विद्यार्थी, तर 7 लाख 78 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 657 परीक्षा केंद्रात होत असून  252 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.