1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (16:48 IST)

व्हॉट्स अॅपचे नवे रंग

new color of whatsapp
युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्स अॅपने कायमच नवनवीन फीचर्स आणण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या वर्षात व्हॉट्स अॅपमध्ये आणखी काही नवे फीचर्स जोडले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. व्हॉट्स अॅपच्या अँड्रॉड बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर्स उपलब्ध होतील. यात कॉन्टॅक्ट टॅम काढून टाकला जाण्याची अपेक्षा आहे. यासोबतच नवीन स्टीकर आयकॉन्स, ग्रुप कॉलिंगसारखे काही फीचर्स अॅड केले जातील. ग्रुप मॅनेज करण्यासाठी नवा पर्याय दिला जाईल तसंच व्हॉईसवरून व्हिडिओ कॉलवर जाण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.