सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (21:40 IST)

विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

shivsena
शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक सेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केले आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करत होते. 
 
पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरार चे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन दाखविले आहे.
 
औरंगाबादचे युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेच्या निष्ठा मेळाव्यात केली आहे.