सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आता क्लास चालकांकडून खंडणी, चौघांना पोलीस कोठडी

खाजगी शिकवणी संचालकाकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लातूर येथे  न्यायमुर्ती वाय. एच. शेख यांच्या दालनामध्ये चार आरोपींना सुनावनीसाठी हजर करण्यात आले होते. फरार असलेले दोघेजण स्वत:हून काल पोलिस चौकीत हजर झाले असून त्यांना पोलिसांनी त्यांना अटक केली.

शकील शेख, महावीर तुकाराम कांबळे, गौस शेख अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाजीनगर पोलिस चौकीत काल सायंकाळी हजर झाले. या दोघांसह कॉंग्रेस नगरसेवक सचिन मस्के अशा चौघांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. अद्याप तीन जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विजयसिंह हर्षप्रतापसिंह परिहार आणि राजीवकुमार रमाकांत तिवारी हे दोघेही अध्ययन नावाने सिग्नल कॅम्प भागात शिकवणी चालवतात. त्यांना २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खंडणीचा नसून हा वैयक्तीक व्यवहाराचं प्रकरण असल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. पोलिसांच्या मागणीनुसार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे.