बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 मार्च 2018 (15:21 IST)

स्थूलपणा कमी करणे पडले महागात

नांदेडच्या 33 वर्षीय गौरी अत्रे नावाच्या महिलेने स्थूलपणा कमी करण्यासाठी नॅच्युरोपथीवर आधारित वजन करण्याची थेरपी घेतली. पण ह्याचा परिणाम भयावह होत  तिची मज्जासंस्था पूर्णपणे बिघडली. आता तिला चालता, बोलताही येत नाही. याशिवाय बसण्यासही अडचणी येत आहे. सध्या गौरी अत्रे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. मज्जासंस्थेसोबतच त्यांच्या मान, हात आणि पायांवर अनेक गाठी आल्या आहेत.

गौरी अत्रेंना 26 ऑगस्ट, 2017 रोजी निसारगंजली संस्थेच्या एका क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ.सुनील कुलकर्णी यांची ही संस्था असून, तिथे नॅच्युरोपथीच्या मदतीने स्थूलपणा कमी करण्याचा इलाज केला जातो. या संस्थेत 21 दिवस उपचार घेतल्यानंतर गौरी घरी आल्या. या ट्रीटमेंटमध्ये त्यांना काढा, एनीमा दिला जात होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने 16 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2017 या 35 दिवसात त्या औषधं आणि लिक्विड डाएट घेत होत्या.