suvichar

मुलीच्या भावाने केली प्रियकर तरुणाची हत्या

Updated: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (23:15 IST)
अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदूरे (22) खडकपुरा, चांदूर रेल्वे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षयचे चांदुर रेल्वे तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलगी पुरती फसली होती. तीअक्षयच्या नादी लागली होती. ती त्याच्या बोलण्यावर भाळली व तीने त्याच्यासोबत पलायन केले. पोलिसांनी दोघा प्रेमीजणांना पकडण्यात यश मिळवले  होते. मात्र आम्ही आमच्या मर्जीने गेल्याचे दोघांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले. मात्र मुलगी अल्पवयीन असल्यामुळे अक्षयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अक्षयची हत्या झाली त्या दिवशी तो आमला विश्वेश्वर येथे आला होता. तो मुलीच्या भावाच्या नजरेस पडताच त्याचा राग उफाळून आला. मुलीच्या भावाने संतापात त्याच्या दोघा अल्पवयीन मित्रांच्या मदतीने अक्षयला बेदम मारहाण केली. अक्षयला भिवापूर रस्त्यावर दुचाकीने नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर देखील गावात नेऊन भर चौकात मारहाण केली. या मारहाणीत अक्षय जखमी झाला. जखमी अक्षयला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारार्थ त्याला नागपूर येथे रवाना करण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा जिव गेला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई: चर्चगेट-विरार रेल्वेमार्गालगतची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम

अत्यंत फायदेशीर व्यवसाय "लसूण लागवड Garlic Farming"

मी हक्कांविषयी बोलण्यासाठी गेलो होतो; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

एसी, रेफ्रिजरेटर, की सीलिंग फॅन; वर्षभरात कोणते घरगुती उपकरण सर्वाधिक वीज वापरते?

पुढील लेख
Show comments