deepawali
✕

उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र : मराठवाड्यातील तापमान वाढणार

Updated: बुधवार, 3 एप्रिल 2024 (11:55 IST)
 
सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीसुद्धा उन्हाच्या झळांची उष्णता जाणवत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम रहात असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापुरात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार
हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरू असणारा एप्रिल आणि ऐन उन्हाळ्यातला मे महिना अधिक उष्ण राहणार असून, यादरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागात उष्णतेच्या लाटा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळे दैनंदिन कामं आणि सध्या सुरू असणारी निवडणुकांची रणधुमाळी पाहता या काळात विशेष काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने केल्या आहेत.
 
मराठवाड्यातील तापमान वाढणार
नुकताच भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. या अहवालामध्ये देशभरात मार्च महिना अल निनोमुळे सरासरीपेक्षा उष्ण ठरल्याची बाब समोर आली. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचा इशारा यावेळी हवामान विभागाने देत येत्या काळात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही वर्तवली.

Edited By- Ratnadeep ranshoor
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये मोठा अपघात; बस उलटल्याने ११ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज खेळला जाणार

"एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचे असेल तर, भाजपपेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील''-रामदास आठवले

वाशिम जिल्ह्यात दुर्गा विसर्जन मिरवणुकीत दगडफेक! अनेक वाहनांची तोडफोड; पोलीस तैनात

देशात मोठी उलथापालथ होणार! संजय राऊत यांच्या दाव्याला पाठिंबा देत राज ठाकरे म्हणाले.....

पुढील लेख
Show comments