Marathi Biodata Maker
✕

Accident in jodhpur जोधपूरमध्ये भीषण रस्ता अपघात

Updated: शनिवार, 7 जानेवारी 2023 (11:19 IST)
 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस जोधपूरहून ओसियान (चाडी)कडे जात होती. यादरम्यान जोधपूर-मथानिया मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकला त्यांची जोरदार धडक झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच स्थानिकांनी प्रथम घटनास्थळ गाठून बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. लोकांच्या माहितीवरून स्थानिक पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना तात्काळ जोधपूरच्या मथुरादास माथूर रुग्णालयात खाजगी वाहनाने नेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दोन्ही वाहनांच्या केबिनमध्ये बसलेले लोक चांगलेच अडकले होते. मोठ्या कष्टाने त्यांना बाहेर काढले.
 
 सीएम गेहलोत एमडीएम हॉस्पिटलमध्ये पोहोचले
घटनेची माहिती मिळताच जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता आणि माजी डीसीपी अमृता दुहान हेही घटनास्थळी पोहोचले. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ओसियाचे आमदार दिव्या मदेरणा, माजी संसदीय सचिव आणि ओसियाचे आमदार भैराराम सोल यांनीही मथुरादास माथूर रुग्णालयात पोहोचून जखमींची काळजी घेतली. दरम्यान, जोधपूरला पोहोचलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आपले इतर कार्यक्रम रद्द करून रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. अपघातग्रस्तांवर तातडीने योग्य उपचार करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.
 
 42 लाख रुपयांची मदत मंजूर
त्यानंतर मृत आणि जखमींसाठी तातडीने मदत पॅकेज जाहीर करण्यात आले. याअंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना 42 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. यामध्ये पाच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि 32 जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर चिरंजीवी विमा योजनेंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना 5-५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Birsa Munda Jayanti 2026 Wishes बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

LIVE: मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले

माजी महापौर मीनाक्षी शिंदे अडचणीत? दीड कोटींची आलिशान कार भेट स्वीकारल्याचा आरोप; प्रकरण एसीबीकडे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या फोनमध्ये २० हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त

पुढील लेख
Show comments