शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (10:45 IST)

कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

abortion
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पडळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टर नसतानाही गर्भपात करत असल्याचे समोर आले आहे. 
 
कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि अंनिसनच्या वतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा ही धक्कादयाक घटना उघडकीस आली आहे. उमेश पोवार, हर्षल नाईक असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यात घटनास्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा साठा सापडला असून संबंधित आरोपींकडे गर्भपातासाठी महाराष्ट्र आणि गोव्याच्या विविध भागातून अनेक रुग्ण आल्याचे देखील समजते.
 
या प्रकरणात गर्भलिंग निदान करणाऱ्या अनेक डॉक्टरांची नावही उघडकीस आली असून या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
 
पडळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने गर्भपात सुरू असल्याची माहिती मिळत होती. तेव्हा कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि अंनिसनच्या वतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले त्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला.