बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (15:22 IST)

एमपीएससीकडून सी सॅट पेपर संदर्भात महत्वाचा निर्णय

MPSC
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे  घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन पेपर पैकी सीसॅट (C SAT) आता पात्रतेसाठीच असणार असल्याचे परिपत्रक राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळ वर प्रकाशित झाले आहे. ३३% गुण या पेपरसाठी अनिवार्य असणार आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या  पूर्व परीक्षेत उमेदवारांना ‘सी-सॅट’ पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’नेही ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जात असताना एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उत्तीर्णतेच्या अटीमुळे नुकसान होत असल्याचे सांगत राज्यभरातील उमेदवारांकडून सी सॅट पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात येत होती. त्या बाबत स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून निवेदन देण्यासह आंदोलनेही करण्यात आली.