1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (12:37 IST)

इंदुरीकर महाराजांनी लस न घेता सांगितलं कोरोनावरचं औषध

Indurikar Maharaj prescribed coronavirus without vaccination
कीर्तनकार इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. अलीकडेच नाशिकमध्ये इंदुरीकर महाराजांचे झालेल्या कीर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आहे ज्यात त्यत्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणावर भाष्य केलं आहे. तसेच आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात म्हटले की प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा.
 
एकीकडे संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असतानाच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे सार्वजनिकपणे नागरिकांना सांगत आहेत. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.