Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यांची तिकीट कापल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह पेटला खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा

Updated: गुरूवार, 14 मे 2020 (16:19 IST)
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘एकनाथ खडसे यांनी पक्षात मार्गदर्शकाची भूमिका बजवावी’ असा सल्लावजा टोला लगावला होता. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर एकनाथ खडसे यांनी भाष्य करत पाटलांना भाजपमधील कामाची आठवण करून दिली.
 
खडसे म्हणाले की, ‘आज चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असले तरी त्यांच्या अगोदर मीच ती भूमिका बजावत होतो आणि मला सांगितलं तर पुढेही बजावत राहील’.
 
तसंच, ‘पक्षाने मला भरपूर दिले आहे हे नाकारून चालणार नाही. पक्षाने भरपूर दिले आहे मात्र पक्षासाठी आम्हीही खूप खस्ता खाल्या आहेत. आमचं आयुष्य समर्पित केलं आहे याचा ही विचार करायला हवा. पक्षाचे ऋण कधीही विसरणार नाही. मात्र, आम्ही पक्षात आयात केले नेते नाही.
 
गोपीचंद पडवळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपसाठी काय केलं आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांचं काय योगदान आहे, अशी अनेक नावं सांगत येतील.पक्षासाठी खस्ता खाणारे राहिले बाजूला आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिकीट दिले’ अशी नाराजी पुन्हा एकदा खडसेंनी बोलून दाखवली. आयात नेत्यांमुळे आम्हाला डावललं गेलं म्हणून आम्ही पक्षाच्या पुढेही भूमिका मांडली आहे. पुढची भूमिका अजून ठरलेली नाही. कोरोना संकट दूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे काय करायचं आहे ठरवू, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

बारामतीत कुटुंबीयांच्या ओरडण्याने अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलले; दुर्दैवी घटनेने हळहळ

मुंबईतील एक २९ वर्षीय महिला रक्षाबंधनासाठी ऑनलाइन बॅग खरेदी करत असताना सायबर फसवणुकीला बळी

देशातून ४८ लाख टन साखर गायब? राजू शेट्टींचा २० हजार कोटींच्या साखर घोटाळ्याचा खळबळजनक दावा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडितांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

पुण्यात राहुल गांधींना एका तरुणीने अचानक गालावर किस केले; व्हिडिओ व्हायरल!

पुढील लेख
Show comments