Dharma Sangrah

नागपूर शहरात लॉकडाउनची घोषणा

Updated: गुरूवार, 11 मार्च 2021 (13:25 IST)
 
नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत परिस्थितीची माहिती देत सांगितले की नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरता येणार नाही. या दरम्यान कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
 
लॉकडाउनमध्ये खासगी कार्यालयं बंद राहतील तसेच शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. तसेच खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. 
 
लॉकडाउनमध्ये मद्यविक्री दुकान बंद राहतील. ऑनलाइन मद्यविक्री सुरु राहील तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. या दरम्यान लसीकरण सुरु ठेवलं जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 
लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. काळजी म्हणून घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरची एक उदयोन्मुख तरुण डॉक्टरचा रस्ते अपघातात मृत्यू

LIVE: महाराष्ट्र सरकारने दहशतवादी साहित्याविरोधात मोठी कारवाई करत सामग्री जप्त केली

ट्रम्प यांनी पाकिस्तानला मध्यस्थी करणाऱ्या देशांच्या यादीतून वगळले, इस्लामाबादने स्पष्टीकरण दिले

तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला तर या पोर्टलचा वापर करून तो ब्लॉक करा, कोणीही तो वापरू शकणार नाही

विदर्भात वाघ आणि बिबट्याची दहशत; मेंढपाळाला ओढून नेले तर दोन जण जखमी

पुढील लेख
Show comments