1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (14:55 IST)

Malshej Ghat : माळशेज घाटात दरड कोसळली, सुदैवाने जन हानी नाही, वाहतूक ठप्प

darad
सध्या पावसाने धुमाकूळ केला आहे. सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळत आहे. 
सध्या पावसाळा सुरु यामुळे पर्यटक वर्षाविहारचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. पावसामुळे  माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यानन्तर नगर -कल्याण महामार्गची वाहतूक ठप्प झाली असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थली पोहोचून मार्गावरील दरड हटवण्याचे काम सुरु केले. 

सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरड मार्गवरुन हटवण्याचे काम जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने सुरु होते. 
 
Edited by - Priya Dixit