Marathi Biodata Maker
✕

दुकानांना मराठी पाट्याः राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला हा इशारा

Updated: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:49 IST)
 
राज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलने केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच.
 
राज पुढे लिहितात की, यानिमित्त महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारने करुन ठेवली आहे ती म्हणजे, मराठी भाषेशिवाय इतर भाषेचेही नामफलक चालतील. याची काय गरज आहे. महाराष्ट्राची भाषा देवनागरी लिपीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार. आणि याची आठवण आम्हाला पुन्हा करायला लावू नका. महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, CBI चौकशीची मागणी

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांवर आता AI ची नजर! CCTV आणि AI आधारित रिअल-टाइम देखरेख प्रणाली लागू होणार

मुंबईत सीएनजी दरात ₹१ ची वाढ, नवीन दरांचा प्रवाशांच्या बजेटवर परिणाम

उत्सवादरम्यान हीरोची स्वस्त स्कूटर खळबळ माजवेल

पुढील लेख
Show comments