शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (22:57 IST)

सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी सर्व पक्षीय नेते राज भेटीला

पुण्यातील सोमाटणे टोल नाका बंद करण्याप्रकरणी सर्व पक्षीय नेत्यांनी आज मनसेप्रमुखराज ठाकरे यांची भेट घेतली. तळेगाव येथील टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंना केली आहे.  फक्त दीड किमी अंतरावर २ टोलनाके असल्याने कायद्याला हरताळ फासून टोलनाक्याआडून नागरिकांची लूट सुरु असल्याचं सर्व पक्षीय शिष्टमंडळाने सांगितले. 
 
सर्व पक्षीय शिष्टमंडळानी दिलेल्या माहितीनंतर, ताबडतोब राज ठाकरे यांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे विरेंद्र म्हैसकरांना फोन केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील या विषयावर बोलतो, असं सांगितले. त्यानंतर विरेंद्र म्हैसकर यांनी देखील यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन राज ठाकरेंना दिले.