रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (23:29 IST)

बाप्परे, मैदानावर क्रिकेट खेळत असताना खेळाडूचा जागीच मृत्यू

पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका क्रिकेटपटूचा मैदानावर क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. महेश विठ्ठल नलावडे असं क्रिकेटपटूचं नाव आहे. जाधववाडी इथं टेनिस बॉल क्रिकेटचे सामने सुरु होते.ओझर संघाचे टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडून महेश नलावडे खेळ सुरू असताना मैदानावर अचानक कोसळला. 
 
त्यानंतर मैदानावर कोसळल्यानंतर त्याला नेमकं काय झालं हे कुणालाच कळेना. इतर खेळाडूंनी त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता