शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बेळगाव , गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (17:54 IST)

मराठी-कानडी विद्यार्थी भिडले

student
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील गोगटे कॉलजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा केला जात होता. यात डान्स करताना बारावीच्या एका विद्यार्थ्याने डान्स करतानाच कर्नाटकचा झेंडा फडकावला. यावर महाराष्ट्राचे समर्थन करणारे विद्यार्थी नाराज झाले. याचा विद्यार्थ्यांनी जाब विचारला. यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. कॉलेज व्यवस्थापनाने मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता परत सीमावाद पुन्ह पेटण्याची शक्यता आहे.
 
यानंतर पोलिसांनी कॉलेजबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेली नाही. पण या घटनेचं पडसाद कॉलेजबाहेरही उमटले. कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गोगटे कॉलेजबाहेर निदर्शनं केली. कॉलेजसमोरचा रस्त्यावर टायर जाळून रस्ता बंद करण्यात आला, तसंच महाराष्ट्राविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटकवरुन गोव्याला जाणारा रस्त्या अनेक तास जाम करण्यात आला होता.

Edited by : Smita Joshi