suvichar

चिमुकली आजारी असतांना रडते म्हणून आईने केली तिची हत्या

शनिवार, 20 जुलै 2019 (09:40 IST)
चिमुकली स्वरा ही मागील काही दिवसांपासून आजारी होती, त्यामुळे सहाजिकच तिचे रडणेदेखील वाढले होते. त्यामुळे आई योगिताला स्वराचा फार कंटाळा आलेला होता. सोबतच स्वरावरील औषधोपचाराचा, तिचा सांभाळ करण्याचा योगिताला खूप वीट आला होता. तर हा कंटाळा पुढे तिटकार्‍यात बदलला व आई  योगिताने अत्यंत थंड डोक्याने स्वराच्या गळ्यावर ब्लेड चालवत तिची हत्या केली. फक्त वय १४ महिने असलेल्या स्वराचे रडणे कायमचे बंद केले. तर पुढे घरात शिरलेल्या चोरट्याने स्वराची हत्या केल्याचा बनाव योगीताने केला. हे सर्व सत्य पोलीस तपासातून पुढे आले आहे. नाशिक येथील औरंगाबाद रोडवरील साई पॅराडाइज सोसायटीमधील रहिवासी योगिता मुकेश पवार हिने घरात एकटी असताना, मंगळवारी दि. 16 स्वत:ची लेक स्वरा (14 महिने) हिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांकडे तक्रार नोंदवताना अज्ञात चोरट्याने स्वराची हत्या केल्याचा बनाव केला. पंचनाम्यात समोर आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून योगिताचा बनाव उघडकीला आला. योगिता पवार हिला पोलिसांनी बुधवारी (दि.17) अटक केली होती. या आईला न्यायालयात उभे केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments