शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (14:04 IST)

MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर, 21 मार्चला होणार पूर्वपरीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 21 मार्च 2021 रोजी होणार आहे.
 
राज्य सेवेची पूर्वपरीक्षा 14 मार्च 2021 रोजी नियोजित होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काल (11 मार्च) पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नवी तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.
 
अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. ही 2020 या सालाची पूर्वपरीक्षा आहे.
 
या पत्रकात आणखी दोन सूचना आयोगानं दिल्या आहेत :
 
14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेसाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल.
 
27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसंच, 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेल नाही.