बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2025 (20:09 IST)

नागपूर पोलिसांकडून 25 लाख रुपयांचा चायनीज मांजा जप्त

maharashtra police
14 जानेवारी मकर संक्रांतीला सर्वत्र उत्साह पाहायला मिळतात. या दिवशी तीळ गुळाचे लाडू, दही, खाण्याची प्रथा आहे. या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे. आकाश पतंगांनी भरलेलं दिसतं.पंतग उडवण्यासाठी चायनीज मांजाचा वापर सर्रास केला जातो. पंतंगबाजीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात.मुके पक्षी देखील मांजामुळे बळी होतात.म्हणून भारतात चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे.
नागपुरात पोलिसांनी तब्बल 25 लाख रुपयांचा चायनीज मांजा जप्त केला आहे. नागपूर पोलिस ड्रोनच्या माध्यमातून पतंग उडवण्यावर लक्ष ठेवून आहे. पोलीस रस्त्यावर उतरून नायलॉनचा मांजाआणि चायनीज मांजा न वापरण्याचे आवाहन करत आहे.तरीही लोक नायलॉनचा आणि चायनीज मांजा वापरत आहे. 

या प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांना नायलॉन मांजाच्या 2599 चक्री जप्त केला असून 25 लाख रुपयांचा किमतीचा नॉयलॉन मांजा रोडरोलर चालवून नष्ट केला. नॉयलॉन व चायनीज मांजासह पकडलेल्या व्यक्तींना पोलीस कोठडीत पाठवले जाणार आहे. 
चायनीज मांजामुळे अनेक अपघात दुचाकीस्वारांसोबत होतात. त्यामुळे प्रशासन कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit