नाना पटोले : भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून 'जय बळीराजा'
महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोन संवादादरम्यान हॅलोऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावं, असा आदेश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. यासंदर्भात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच काँग्रेसकडून या घोषणेवर आगळ्यावेगळ्या स्वरुपाची भूमिका मांडली जात आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना भेटताना तसंच जनतेशी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून केली.
नाना पटोले म्हणाले, "राष्ट्रगीत - वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसांत भेटताना जय बळीराजा म्हणावं."