1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:17 IST)

राष्ट्रवादी करणार रेल्वे विरोधात आंदोलन

मुंबई येथे झालेल्या चेंगराचेंगरी ही भाजपा सरकारच्या चांगलीच अंगाशी येणार असे चित्र आहे. यामध्ये आता प्रत्येक राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 ऑक्टोबर रोजी कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला जाणार आहे.बुलेट ट्रेन ऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या जाव्यात आणि त्यांना  प्राधान्यक्रम द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी आता रेल्वे रोखरणार आहे.  या आंदोलनाची  माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले. एकूणच रेल्वेच्या पादचारी पुलांच्या समस्यांकडे सर्वाच्याच नजरा वळल्या आहेत. बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविण्याऐवजी आणि ज्या ट्रेनचा मुंबईकरांना फायदाच नाही, अशी ट्रेन बंद करावी अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.