बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

रेल्वे मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई परळ-एलफिन्स्टन
मुंबईतील परळ-एलफिन्स्टन पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर  रेल्वेच्या नव्या गाड्यांच्या फेऱ्यांच्या शुभारंभाचा  होणारा नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबई एअरपोर्टवर दाखल झाले. त्यानंतर पियुष गोयल मुंबईला पोहचताच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि पियुष गोयल एअरपोर्टवरून तातडीने केईएमकडे रवाना झाले आहेत. एलफिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे मंत्र्यांचा  कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसंच  पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत.
 
परळ-एलफिन्स्टन पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त प्रवाश्यांनी केली आहे. ​