सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांक

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एल्फिन्स्टन -परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला ३० प्रवासी जखमी झाले आहेत.
 
 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची मोठा गोंधळ निर्माण झाला होता.  यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यामध्ये  ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरली होती.हि घटना इतकी भयानक होती की  चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि जखमी होऊन 22 जणांचा मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये 18 पुरुष, तर चार महिलांचा समावेश आहे. ३० जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
 
या भागात असलेल्या फेरीवाला आणि अतिक्रमण यामुळे हा अपघात घडला आहे. नागरिकांना रोज येथे प्रवास करावा लागतो मात्र त्यांची कोणीही काळजी घेत आन्ही. मुंबई इतिहासात हा दिवस काळा दिवस म्हणून लिहिला गेला आहे.पियुष गोयल मुंबईत असतानाच एलफिन्स्टन - परळची दुर्घटना घडली आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आरोग्य मंत्री दीपक सावंत, शिक्षण मंत्री विनोद तावडेही केईएममध्ये दाखल झाले आहेत.मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल रेल्वेच्या नव्या टाईमटेबलच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी मध्य रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्थानकावर ही दुर्घटना घडली आहे.रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा घेऊन रेल्वे प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी केली आहे.
 
मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांक
 
केईएम हॉस्पिटल : 022-24107000
वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959
मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725
ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999