सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई: एल्फिस्टन रेल्वे स्थानाकावर चेंगराचेंगरी, 22 ठार

मुंबईतील एलफिन्सटन स्थानकातील पुलावर गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जण मृत्युमुखी पडले तसेच 30 जण जखमी झाले. सकाळी मुसळधार पाऊस सुरू असताना लफिन्सटन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावर प्रचंड गदी होती. तेव्हाच शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली. 
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातून 22 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेच्या पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. अतिशय रूंद पूल, पाऊस, गर्दी आणि अफवा या कारणांमुळे दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.