बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 25 डिसेंबर 2019 (13:04 IST)

राष्ट्रवादीच प्रदेशाध्क्षपदी : मुंडे, शिंदे, आव्हाडांची नावे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महत्त्वाचे मंत्रिपद सोपविण्यात येत असल्याने आता प्रदेशाध्क्षपदासाठी धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्क्ष जयंत पाटीलांच्यासह छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

जयंत पाटील यांच्याकडे महत्त्वाचे मंत्रिपद देण्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्क्षय शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील प्रदेशाध्क्षपदाची जबाबदारी दुसर्‍यावर सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंडे, शिंदे, आव्हाड यांची नावे चर्चेत असले तरी मुंडे यांनाच ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची शक्ता वर्तविण्यात येत आहे.