सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तर प्रियंका यांची गंगायात्रा झाली असती का ?

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय. 
 
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, गंगायात्रेच्या दरम्यान प्रियंका गांधी यांनी गंगेचं पाणी प्यायल्या, जर गंगा नदीची स्वच्छता आम्ही केली नसती तर गंगेचे पाणी पिता आलं असतं का ? युपीए सरकारच्या काळात तुम्ही हे काम केलं नाही. ते काम आम्ही केले. मार्च 2020 पर्यंत गंगा नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली असेल असा दावा नितीन गडकरी यांनी केला.