1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (21:54 IST)

चित्रा वाघ यांना नोटीस, म्हणाल्या माझी लढाई अशीच सुरूच राहणार

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबाद्दल आयोगाने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे. उर्फी जावेदप्रकरणी चित्रा वाघ यांनी मोर्चा उघडला होता. याचप्रकणारत त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आता या नोटिशीविरोधातच चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.
 
ट्वीट करत चित्रा वाघ म्हणतात की, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही… अशी भूमिका घेणारीला पाठवली… असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!
 
Edited By - Ratnadeep Ranshoor