शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:18 IST)

आता 'या' ही मार्गावर धावणार शिवशाही, प्रवाशांना दिलासा

एसटी वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर आता शिवशाहीदेखील रस्त्यावर धावणार आहेत. त्यानुसार ठाणे, बोरिवली, कल्याण येथून बोरिवली, मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर आणि अलिबाग या मार्गांवर वातानुकूलित शिवशाहीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे-१ आगारातून २२, ठाणे-२ आगारातून १६, तर कल्याण आगारातून १२ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता. त्याचा परिणाम खासगी व शासकीय क्षेत्रातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बसला. आता टाळेबंदीत शिथिलता आणून आर्थिकचक्र गतिमान करण्यासाठी विविध व्यवसायांना व वाहतुकीला शासनाने परवानगी दिली. यात आता वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून उपरोक्त मार्गांवर शिवशाही धावणार आहे.