Daily Horoscope
✕

राज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट

Updated: मंगळवार, 30 मे 2023 (08:14 IST)
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
 
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर शाब्दिक युद्ध रंगलेले महाराष्ट्राने पाहिले होते. राज ठाकरे यांनी कर्नाटक निकालातून जनतेला गृहित न धरण्याचा बोध घेण्याचा सल्ला भाजपला दिला होता. त्यावरुन फडणवीस यांनी बाहेरच्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, असे राज यांना सुनावले होते. नाशिक जिल्हा दत्तक घेण्याचे विधान फडणवीसांनी २०१७ मध्ये केले होते. त्याची आठवण राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत पत्रकारांना करुन दिली होती. नाशिक दत्तक घेणारे आता कुठे आहेत? असा सवाल करत राज यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला होता. या शाब्दिक वादानंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट आहे.

भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी
भारतीय जनता पक्ष सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यानिमित्ताने भाजपचे मुंबईत विविध कार्यक्रम होत आहेत. सोमवार दुपारी सव्वा बारा वाजता भाजपचा मुंबई महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, उपमुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, महासंपर्क अभियान प्रमुख प्रवीण दरेकर उपस्थित होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

भंडारा जिल्ह्यात ५ वर्षांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

आंद्रे रसेलने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला

मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षाची ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची तयारी

दुष्काळ असूनही मदत मिळत नसल्याचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयाने दुष्काळ निवारणाबाबत महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले

Asian Champions Trophy भारताने जपानचा धुव्वा उडवत इतिहास रचला! सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments