शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 मे 2023 (20:20 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी (दि. १९ मे) नाशिक दौऱ्यावर

raj thackeray
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये बैठका घेणार आहे. त्यांच्या बैठकीच्या कार्यक्रमात नव्याने बदल करण्यात आला असून आता १९ मे रोजी ते नाशिकमध्ये येणार आहेत.
 
२१ मेपर्यंत तीन दिवस बैठका चालतील. मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून १८ ते २० मे, असा दौरा निश्चित करण्यात आला होता.
हे ही वाचा:  नाशिक: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार; अवजड वाहतुकीचा बळी
 
त्यात आता बदल करण्यात आला असून, १९ मेपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या तीनदिवसीय दौऱ्यासंदर्भात मंगळवारी (ता. १६) पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठक झाली.
 
प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंदे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, म्युनिसिपल कामगार-कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.