रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (12:17 IST)

जमावाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न काय आहे नेमके प्रकरण , जाणून घेऊ पूर्ण रिपोर्ट

Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतकेच नाही तर मुस्लिम समाजाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढविण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र उरुसनंतर घुसखोरी करणाऱ्या एका समाजाला सुरक्षारक्षकांनी रोखले आहे.
 
दरम्यान मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात तणाव निर्माण होताच पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. तसेच मंदिर प्रशासनाकडून घुसखोरी करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.
 
काय आहे पूर्ण प्रकरण ?
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्म यांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला.
 
या घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकारा बाबतपत्र दिले आहे. तर दुसरीकडे नाशिक ग्रामीण व शहर पोलिसांनी जमाव बंदी केली आहे.
सदर घटनेचा तपास करून संबंधीतांवर याग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील मंदिर ट्रस्ट सह ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान अशाच प्रकारे पुरोहित संघ, ब्राम्हण महासंघ, मराठा महासंघ यासह सुमारे 15 हिंदुधर्मिय संघटनांनी निवेदन तक्रार अर्ज दिले आहेत.
 
यावेळी 10 ते 12 युवकानी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तास असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही असे सांगीतले. त्यानंतर जवळपास 15 मिनेट त्यांच्या हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तेथून पुढे निघुन गेले.
 
आज याबाबत त्रंबकेश्वर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक जगताप, गवळी यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणार्या लोकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor