शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज ठाकरे पाडव्याला मेळाव्यात साधणार संवाद

जवळपास १२ वर्षं मराठी माणूस, भूमिपुत्र, मराठी भाषा हे प्रमुख मुद्दे राज ठाकरे लढत आहेत. तर 'खळ्ळ-खटॅक'साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढचा मार्ग कसा असेल नेमके काय करायचे आहे. त्यांचं 'इंजिन' कुठल्या दिशेनं पुढे जाईल, हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार आहेत.  तर त्या दिवशी अनेक ठिकाणी वीज जाते त्यामुळे आपला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचू दिला जात नाही त्यासाठी तुमच्या भागातील जो वीज वितरण अधिकारी असेल त्याला भेट द्या आणि जर मेळाव्याच्या दिवशी वीज गेली तर त्या वीज अधिकाऱ्याला तुडवा असा इसारा राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
 
मनसेच्या स्थापनेला आज १२ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. १८ तारखेला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत मी माझं म्हणणं मांडेन, असं राज यांनी स्पष्ट केलं. १८ तारखेला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. पण, यावेळी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवा. सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. कारण, इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणं गरजेचं आहे, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.