रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जुलै 2018 (09:01 IST)

वसतिगृहातील विद्‍यार्थींनींचा कार्यालयात बोलवून लैंगिक छळ

मुलींच्या पंढरपूर शासकीय वसतिगृहातील विद्‍यार्थींनींचा कार्यालयात बोलवून लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणी वसतिगृह अधीक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. गुरुकृपा सोसायटी, चैतन्य नगर, पंढरपूर) याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर पोलिस विभागाच्या निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे व उपनिरीक्षक प्रिती जाधव यांच्या पथकाने वसतिगृहास भेट दिली होती. तेव्हा हा सर्व प्रकार  उघड झाला आहे. अनेक विद्‍यार्थीनींनी यावेळी वसतिगृह अधीक्षक संतोष देशपांडेच्याविषयी तक्रारी केल्या. देशपांडे हा मुलींना विविध कारणांनी कार्यालयात एकटे बोलावून त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करत होता, अशी रीतसर तक्रार मुलीनी पोलिस ठाण्यात दिली आहे. संतोष देशपांडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपअधीक्षक अनिकेत भारती करत आहेत.