1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (11:23 IST)

Road Accident : ट्रकची ट्रॅक्टरला धडक चौघांचा मृत्यू

सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरआणि ट्रकचा अपघात सांगली -सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर 10 ते 12 जण जखमी झाले आहे. 
सदर घटना सांगली -सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री घडली आहे. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकची धडक होऊन अपघात होऊन चार मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीनं मिरजच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टरला मागून ट्रकने जोरदार धडक दिली. या ट्रॅक्टर मध्ये 10 पेक्षा अधिक ऊसतोड कामगार आणि त्यांची मुले होती. हे सर्व ऊसतोड कामगार सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार येथील होते. काम आटोपून घरी जातांना हा अपघात झाला. या अपघात चौघांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि लहान मुलीचा समावेश आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.   
 
Edited by - Priya Dixit